जो चार अक्षरे जपेन। जगदंब जगदंब ऐसे म्हणोन। त्याची दुष्टाक्षरे पुसीन ललाटावरची।।
।।ॐ नमो नारायणाय सिद्ध पुरुषाय ब्रह्मीभूत योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजाय नमो नमः।।
साधना कशी असावी, नराचा नारायण कसा होतो हे चरित्रातून, आचरणातून दाखविणारे प.पू.योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज!
पूर्वाश्रमी ‘हरी’ हे नामाभिधान धारण करणारे स्वामी!सद्गुरू आज्ञेने १०८ गुरुचरित्र पारायणे, गायत्री पुरश्चरण, पाशुपत व्रत तथा मृत दिक्षा संस्कार अशा अनेक साधना स्वामींनी लीलया पूर्ण केल्या!
साधनेच्या अग्नीत सिद्ध देहाचे आता नामकरण झाले ‘हरीहरानंदनाथ’! या साधनेत साथ दिली ती माता प्रेमानंदीनाथ माउलींनी!
कायमच मुमुक्षु वृत्ती, पराकोटीचे वैराग्य अशा आचरणातून स्वामींनी ‘संसारातून परमार्थ’ हा मार्ग सर्वांना दाखविला!
सद्गुरू सिद्धनाथ महाराज तथा प्रत्यक्ष पिता सद्गुरू स्वामी कृष्णानंद यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परमार्थाचा प्रवास स्वामींनी साध्य केला!
प्रत्यक्ष आई भगवती रेणुका माता ‘स्वयंभू’ रूपाने प्रगटली!
लाखो भक्तांच्या कल्याणार्थ स्वामींनी संपूर्ण देशात पायी प्रवास करून जगदंबेच्या नामाचा प्रसार केला!
संन्यास दीक्षेच्या ‘हंस दिक्षा’ या प्रकारातील दिक्षा प्राप्त केल्यावर स्वामींचे नामाभिधान झाले प.पू. योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज!
अशा या दुर्लभ योगीराजाच्या चरणी साष्टांग दंडवत!