चित्रमय स्वरूप स्वामींच्या अनेक लीला, साधना, उपासना बालपणी स्वामी जमीनीपासून एक वीत उंच हवेतून चालत. घरातील संपूर्ण स्वयंपाक तसेच कच्चे कांदे, बटाटे, गाजर, मुळा खाऊन फस्त करीत असे. सायं संध्या करीत असताना एकदा संबळवाला येतो व त्या ध्वनीने स्वामींना पहिल्यांदाच संचार होतो. विंचू चावून रामनामाने उतरविणे, एका पायावर उभे राहून तीन तास साधना करणे, गडाबडा लोळून आईच्या नावाने ओरडणे. सप्तश्रृंगी वणी येथे पिता कृष्णाजींना एका महान साधूंनी सांगितलेले स्वामींबाबतचे भविष्य खरे होते. नगर येथील बालाजी मंदिरात जगदंबेसमोर देहभान विसरुन आठ-आठ तास नृत्य करीत असे. नगर येथील बालाजी मंदिराच्या गच्चीवर साधनेत मग्न असताना तेजाच्या झोतात येऊन प. पू. सद्गुरु सिध्दनाथ महाराज दर्शन देतात. नगर येथील बुह्राणनगर येथे स्वामींनी 12 दिवस वायु आहार, 12 दिवस जल आहार आणि 12 दिवस गळाभर पाण्यात बसून कठोर तपश्चर्या केली. बद्दीसारोळा टेकडीवरील श्रीरेणुकामातेच्या दर्शनाला कुटुंबियासह जाताना स्वामी 9 कि.मी. लोटांगण घेत टेकडीवर मातेच्या दर्शनाला गेले. प. पू. कृष्णानंदांनी हरि व रमा यांच्यावर मृतसंस्कार केले व त्यानंतर हरिहरानंदनाथ व प्रेमानंदिनाथ असे नामाभिधान झाले. दिक्षा संस्कारातील भस्मदिक्षा तथा हंसदिक्षा संस्कार झाल्यानंतर स्वामींचे प. पू. राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज असे नामाभिधान झाले. वयाच्या 82-83 वर्षी सुध्दा नित्य साधना, भगवती उपासना, पूजा असे सर्व काही चालू होते. स्वामी महायात्रेची तयारी करण्याचे संकेत देत होते.