जो चार अक्षरे जपेन। जगदंब जगदंब ऐसे म्हणोन। त्याची दुष्टाक्षरे पुसीन ललाटावरची।।

।।ॐ नमो नारायणाय सिद्ध पुरुषाय ब्रह्मीभूत योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजाय नमो नमः।।

साधना कशी असावी, नराचा नारायण कसा होतो हे चरित्रातून, आचरणातून दाखविणारे प.पू.योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज!

पूर्वाश्रमी ‘हरी’ हे नामाभिधान धारण करणारे स्वामी!सद्गुरू आज्ञेने १०८ गुरुचरित्र पारायणे, गायत्री पुरश्चरण, पाशुपत व्रत तथा मृत दिक्षा संस्कार अशा अनेक साधना स्वामींनी लीलया पूर्ण केल्या!

साधनेच्या अग्नीत सिद्ध देहाचे आता नामकरण झाले ‘हरीहरानंदनाथ’! या साधनेत साथ दिली ती माता प्रेमानंदीनाथ माउलींनी!

कायमच मुमुक्षु वृत्ती, पराकोटीचे वैराग्य अशा आचरणातून स्वामींनी ‘संसारातून परमार्थ’ हा मार्ग सर्वांना दाखविला!

सद्गुरू सिद्धनाथ महाराज तथा प्रत्यक्ष पिता सद्गुरू स्वामी कृष्णानंद यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परमार्थाचा प्रवास स्वामींनी साध्य केला!

प्रत्यक्ष आई भगवती रेणुका माता ‘स्वयंभू’ रूपाने प्रगटली!

लाखो भक्तांच्या कल्याणार्थ स्वामींनी संपूर्ण देशात पायी प्रवास करून जगदंबेच्या नामाचा प्रसार केला!

संन्यास दीक्षेच्या ‘हंस दिक्षा’ या प्रकारातील दिक्षा प्राप्त केल्यावर स्वामींचे नामाभिधान झाले प.पू. योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज!

अशा या दुर्लभ योगीराजाच्या चरणी साष्टांग दंडवत!

चलचित्र
कार्यक्रम
Icon

प. पू. राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांचे जीवन चरित्र

श्री रेणुकामाता विजयते सध्याच्या लोकप्रिय माध्यमातून प. पू. राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांचे जीवन चरित्र सर्वांपर्यंत पोहोचावे याकरिता प्रयत्न आहे.म्हणूनच युट्यूबच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीत योगी हा दुर्लभ चरित्र मांडण्याचा संकल्प प. पू. सदगुरू प्रेरणेतून झाला. या चरित्राची मांडणी लहान व्हिडिओ क्लिप स्वरुपात असून, अनेक दिवस हे कार्य सुरु राहणार आहे. प्रत्येक एकादशीनिमित्त एक भाग असे दर पंधरा दिवसात पुढील चरित्र भाग प्रकाशित करण्याचा प्रयत्न असेल.भाग 1 पाहण्यासाठी https://www.youtube.com/watch?v=Y28JBfLZnLw येथे क्लिक करावे.
Icon

प. पू. ब्रह्मीभूत माता सौ. प्रेमानंदिनाथ महाराज जन्मशताब्दी महोत्सव 2023-2024

परंपरेचे अध्वर्यू प. पू. राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांची सकल साधना पूर्ण व्हावी म्हणून शक्ति रुपाने त्यांना साथ दिली ती मायमाउली प. पू. ब्रह्मीभूत माता सौ. प्रेमानंदिनाथ महाराज यांनी! प. पू. ब्रह्मीभूत माता सौ. प्रेमानंदिनाथ महाराज अर्थात आई साहेब म्हणजे प. पू. स्वामींच्या सहधर्मचारिणी! या मायमाउलीच्या जन्मशताब्दीचे निमित्त आपल्या सर्वांकरिता चालून आले आहे. माघ वद्य चतुर्थी शके 1944 (10 फेब्रुवारी 2023) ते माघ वद्य चतुर्थी शके 1945 (28 फेब्रुवारी 2024) हा महोत्सवाचा पर्वकाळ असणार आहे. प. पू. सदगुरू श्री अप्पा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प. पू. अंबरीश महाराज आणि प. पू. अनिरूद्ध महाराज यांनी महोत्सवाचे नियोजन ठरविले आहे.
Icon

पुढील महिन्यात होणारे कार्यक्रम

चैत्र मास

प. पू. ब्रह्मीभूत माता सौ. प्रेमानंदिनाथ महाराज जन्मशताब्दी महोत्सव निमित्त श्रीहरिहर सद्गुरू शक्तीपीठ छ. संभाजीनगर आयोजित श्रीमद् देवी भागवत भक्तीमय कथा एवंम् पंचकुंडात्मक सामुहिक नवचंडी याग सोहळा
कालावधी – सोमवार 3 एप्रिल ते रविवार 9 एप्रिल 2023
वेळ – सकाळी 9.00 ते 1.00 – सामुहिक नवचंडी याग दुपारी 4.00 ते सायं. 7.00 – श्रीमद् देवी भागवत भक्तीमय कथा वाचन
स्थळ – सप्तपदी मंगल कार्यालय, एन 7, सिडको, छत्रपती संभाजीनगर.
टिप – ज्या भक्तांना नवचंडी याग व श्रीमद देवी भागवत मध्ये यजमान पद घेण्याची ईच्छा आहे किंवा आरती, अन्नदान महाप्रसाद व इतर कोणत्याही सेवेत सहभाग घेण्याची ईच्छा आहे त्यांनी सेवासमिती यांच्याशी संपर्क साधावा.
94224 65112, 98507 41049,
98230 21856
सर्व सद्भक्तांनी या सोहळ्यात सहभागी होऊन आपली सेवा प. पू. सद्गुरू व आई जगदंबेच्या चरणी अर्पण करावी.

आश्रमामध्ये विविध प्रकारच्या सेवा देण्यासाठी आणि श्री रेणुकामाता अभिषेक, प.पू . स्वामी पादुका अभिषेक अश्या अनेक पूजेसाठी येथे भेट द्यावी.

error: Content is protected !!