श्री हरिहर सद्गुरु शक्तीपीठ

श्री रेणुकामाता मंदिर, योगीराजनगर, सातारा परिसर, संग्रामनगर,
संभाजीनगर (औरंगाबाद) महाराष्ट्र पिन कोड – ४३१ ००१

प. पू . हंसतीर्थ स्वामी महाराज (म्हणजे पूर्वाश्रमीचे पू . हरिहरानंद महाराज ) कायम पायी प्रवास करत असत. सोनई पासून कोल्हापूर, बेळ्गाव, मुंबई, पुणे हा पायी प्रवास झाला तसेच विदर्भ, मराठवाडा, नागपूर पर्यंत प. पू . स्वामींनी पायी दिंडी एकूण ९ लक्ष कि.मी. पदयात्रा केली. श्री. क्षेत्र माहुरगढ येथेही पायी यात्रा झाली.

“सदा पायी यात्रा । अंगी दोन वस्त्रे ।
मुखी जगदंब नाम । अंतरी तळमळ जनकल्याणाची” ।।

असे त्यांचे यथार्थ वर्णन होईल . पायी दिंडी मध्ये सामान्य लोकांचे सुख दुः खे समजून घेत येतात , काही मार्गदर्शन करता येते, अशी त्यांची धारणा होती. विदर्भ, मराठवाडा परिसरामध्ये पू . स्वामींचे हजारो शिष्य झाले. औरंगाबाद येथील संग्राम नगर मध्ये (सातारा परिसर – बीड बायपास रोड )शिष्य मंडळींच्या आग्रहास्तव भगवती मंदिर उभारण्याचा निर्णय झाला.

अमृत महोत्सव सोहळ्यानंतर पू . स्वामींचे औरंगाबादला वास्तव्य असताना १९९६ मध्ये मंदिराची पायाभरणी झाली . प. पू . स्वामींनी स्वतः मंदिर आराखडा तयार केला व त्या प्रमाणेच भव्य मंदिर उभे रहिले. या स्थानास “हरिहर” नाव द्यावे असे शिष्य मंडळींचे आग्रहाचे म्हणणे होते. परंतु प. पू . स्वामी पूर्ण विरक्त आणि संन्यासी !! “मी, माझे कुणी नाही, सारी भगवतीची कृपादृष्टी!” हा भाव ठेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात हर म्हणजे महादेव पिंड आणि हरि म्हणजे पांडुरंग या दोन देवतांची विधीपूर्वक स्थापना केली.

“हरिहर शक्तीपीठ” असे नामकरण केले आणि वरील भागात उत्कृष्ठ मंदिर उभारणी करून सोनई येथील योगपीठासनावरील राजराजेश्वरी रेणुकामाते प्रमाणे येथेही रेणूका मातेची भव्य मूर्तीची स्थापना केलि. मोठा सोहळा झाला , अन्नदान झाले. त्या नंतर १९९७/९८ मध्ये प. पू . स्वामी उपस्थितीत येथे भव्य असे गुरुपौर्णिमा सोहळे झाले. हजारोंनी दर्शनाचा लाभ घेतला. भक्तगण अतिशय आनंदात अन उत्साहात गुरुपौर्णिमा दरवर्षी साजरी करतात. या हरिहर शक्तीपीठाची संपूर्ण व्यवस्था, उत्सव,वर्षभरातील सोहळे (गुरुपौर्णिमा, नवरात्र इ.) प. पू . अप्पा महाराज , प. पू . स्वामींच्या आज्ञेवरून उत्साहात करत आहेत. मंदिराचे कळस पूजन समयी महाद्वारी वीर हनुमान आणि श्री कालभैरव या देवतांची स्थापना करण्यात आली . प. पू . स्वामींची जेथे बैठक असे त्या ठिकाणी प. पू . स्वामींच्या पादुकांची स्थापना करून नित्य पूजा केली जाते .

 

प. पू . स्वामींचे वास्तव्य आजही येथे जाणवते. भक्तांनी मंदिराच्या शांत सात्विक आणि सुंदर परिसराला जरूर भेट द्यावी आणि स्वामी बसत होते त्या जागेवर बनवलेल्या हॉल च्या प्रसन्न वातावरणाचाही आनंद घ्यावा. प. पू. अप्पा महाराजांचे शिष्यदेखील भारतात अन भारताबाहेर पसरले आहेत. गायत्री पुरश्चरणे , अनेक उपासना , पू. स्वामींचा भरपूर सहवास यामुळे पू. अप्पा महाराजांचे स्वरुप अतिशय प्रसन्न, शांत, तेजस्वी अन आनंदी दिसून येते.

error: Content is protected !!