६४ कला गुणांनी संपन्न

।।प. पू. राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज।।

स्वामींचे अत्यंत सुलभ आणि सहज भाषेतील साहित्य म्हणजे त्यांच्या अवतार कार्यातील एक महत्वाचा कार्यभाग आहे. अनेक स्तोत्रे, आरत्या, भजने, भगवतीच्या षोडशोपचार पूजेतील सर्व पदे खूप सुंदर तथा प्रासादिक आहेत. देवी भागवतातील नवव्या स्कंधावर आधारित ”श्री शक्ती सामर्थ्य परंबिका उपासना ग्रंथ” हा भक्तांसाठी प्रासादिक असा ग्रंथ स्वामींनी लिहिला आहे. अशा या अनमोल साहित्याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा.

प्रार्थना

माते तुझे ध्यान आम्हासी राहो । तुझे नाम आमुचे मुखासी येवो । माते तुजे आम्ही दासानुदास । नमस्कार माते तुज्या चरणास ।। जगदंब जगदंब ऐसे म्हणावे । स्वानंद साम्राज्य भोगावे । देहंतित होवोनी जावे । समाधिस्थिति ।। पुढे वाचा

भजन

भावात्मक भजन अंबा देखता नयनी । धन्य झालो त्रिभुवनी ।।१।।आदिशक्ति आदि माया । ब्रम्हरूपी हिची काया ।।२।। ब्रम्ह ब्रम्ह हीच शक्ति । निर्गुण निराकार म्हणती ।।३।। क्रुष्णतनय म्हणे हरी । माझी सत्ता सदगुरुवरी ।।४।। पुढे वाचा

पद

कोट्यावधी अपराध पतित मी | शरण आलो तुला |
आई गे सांभाळी गे मला | रेणुके सांभाळी गे मला ||धृ ||
तुझी पूजा मी जनात नाही | कैसे करू गे याला ||१||
मंत्र यंत्र हे तंत्र ही नाही

पुढे वाचा

प्रातःस्मरण

नमन नमन विघ्नहरा | तुज ध्याता लंबोदरा | गजवक्त्रा शांत सुंदरा | बुद्धी तूची बा ||१|| उठोनिया प्रातःकाळी | नयनी पाहू हिम नगबाळी | शिवशक्ती चंद्रमौळी | नमन दोघांसी ||२|| दोघांचे एकची स्वरूप | प्रकृती पुरुष देख

पुढे वाचा

ऑनलाईन खरेदीसाठी खालील प्रासादिक साहित्य उपलब्ध आहे.

।।रेणुकामाता की जय।।

नित्यानंदी स्वरुप तुमचे, वायु सवे संचरे।
ब्रह्मानंदी निमग्न असता, तूची आता धाव रे।
प्रातःकाली तुम्हासी स्मरता, विघ्नेची होती दूर रे।
सिद्धनाथ येऊनी आता, भक्तांसी तू पाव रे।
।।प. पू. सद्गुरु सिद्धनाथ महाराज की जय।।

परब्रह्म उभे दिगअंतरी हो।
मुर्ती कैसी साजे पृथ्वी वरी हो।
दिगंबरी सर्व भस्मांग तेजे।
समाधिस्त स्वामी कृष्णानंद साजे।|
।। सिद्धाय सिद्ध पुरुषाय परमानंद मूर्तये साक्षात ब्रह्मरूपाय कृष्णानंदाय नमो नमः ।।

योगीराज स्वामी ब्रह्मरुप ध्यानी।
ओंकार नामी सदा धुंद मनी।
असे सतत रेणुका ध्यान स्वरुपी।
सदानंदी आनंद चिद्घनानंद मुर्ति||
।। ॐ नमो नारायणाय सिद्ध पुरुषाय ब्रह्मीभूत योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजाय नमो नमः।।

जगी साध्वी झाली प्रेमानंदिनाथा।
कलियुगी धन्य धन्य माता।
प्रेमाळू दयाळू अति आर्द्र चित्ता।
नमस्कार माझा प्रेमानंदिनाथा।
।। ॐ नमो नारायणी ब्रह्मीभूत माता प्रेमानंदिनाथ महाराजाय नमो नमः।।

प्रेमळ शांत दयाघन मुर्ती।
प्रेमाहरिची असे ही प्रचिती।
पाहुनी रुपा होय मनः शांती।
नमस्कार माझा श्रीगुरू चरणांसी।
।। प. पू. सद्गुरू श्री अप्पा महाराज की जय।।

भावात्मक भजन
अंबा देखता नयनी । धन्य झालो त्रिभुवनी ।।१।।
आदिशक्ति आदि माया । ब्रम्हरूपी हिची काया ।।२।।
ब्रम्ह ब्रम्ह हीच शक्ति । निर्गुण निराकार म्हणती ।।३।।
क्रुष्णतनय म्हणे हरी । माझी सत्ता सदगुरुवरी ।।४।।

श्री सद्गुरू धाव
सदगुरूराया । नमन असो तुमचे पाया ।। ध्रु ।।
आकाशमार्गी तुमचे गमन । ब्रम्हानंदी निमग्न असून ।।
दर्शन देई झडकरी जाण । हरी लागे तव पाया ।।१।।
सदगुरू नाथ माझे आई । मजला ठाव द्यावा पाई ।।

ध्यानात्मक अभंग
सुंदर ते ध्यान । रेणुका मातेचे ।।
जगदंबेचे जगदंबेचे … ।।१।।
मोतीयांचे हार । हीरे चमकती ।।
गळा हे दिसती । तारांगणे ।।२।।
नाकी नथ साजिरी । कणी मुरक्या बाळी ।।
माथा बिंदी ल्याली । लख लखीत ।।३।।

क्षमापराध
कोट्यावधी अपराध पतित मी | शरण आलो तुला |
आई गे सांभाळी गे मला | रेणुके सांभाळी गे मला ||धृ ||
तुझी पूजा मी जनात नाही | कैसे करू गे याला ||१||
मंत्र यंत्र हे तंत्र ही नाही | माहित नाही गे याला ||२||
गायनपण हे येत नाही | आळवू कैसे तुला ||३||
हरि विनवितो तुझिया चरणी | करूणा येऊ दे तुला ||४||

काय मागो आता तुज अंबाबाई |
मागणे लई नाही तुज आता |
संत सेवा घडो मुखी नाम जड़ो |
दर्शन तुझे घडो अंबाबाई ||

झुला
झुला झुलवितो रेणुके | मनमोहन अंबिके | झुला झुलवितो ||धृ||
सुवर्ण हलकड्या | सुंदर | चौफळ्यामध्ये | दार | गादी|
अंथरली | मखमली | लोड गिरदया | थोर | येउनी |
बैसली | आई माझी | आता मन रंगले ||१||
तेज फाकले स्वरूपाचे | डोळे दीपती साचे | सेवा |
घेई तू | श्री अंबे | कुंकुम | डाळिंब | लिंबे | नारळ |
फणस | नारिंगे | चिक्कू द्राक्ष आंबे | पुष्पाहार | तुला |
घालोनी | हरि लागे चरणी | झुला झुलवितो ||२||

अंबे जो जो जो | रेणुके | भवकुल दीपक माते ||धृ ||
ध्याती मुनियोगी | तुजलागी | माहूरगडच्या माथी ||१||
चारी मुक्तींचा | विचार | चरणी पाहती थोर ||२||
वेद शास्त्रींचा | मति जाण झालो स्वरूपी लीन ||३||
भोळा शंकर | तुजलागी | ठेवी सन्नीध्यानी ||४||
परशुरामाची | जननी | जमदग्नीची पत्नी ||५||
हरि गातसे | पाळणा | श्री रेणूका चरणा ||६||

दृष्ट
मायमाझ्या रेणुकेची | दृष्ट काढु या हो दृष्ट काढु या ||धृ||
माहूरगढी हिच ठाण | भक्तासाठी केलं येण |
आनंदाने सेवा घेई | दृष्ट काढु या हो दृष्ट काढु या ||१||
लाल शालू ही नेसली | अंगी काचोळी घेतली |
कशी वेल्हाळ शोभली | दृष्ट काढु या हो दृष्ट काढु या ||२||
मारुनी दैत्य महिषासुर | तेथे दृष्ट झाली अपार|
भक्तीसुमने घेउनी हाती | दृष्ट काढु या हो दृष्ट काढु या ||३||

कुणाची हो झाली दृष्ट | जगदंबेला ||
उतरीते लिंबलोण आदिमायेला ||धृ||
आली हो आमची आई | मातापुराहून ||
भरजरी शालू अंगी | अलंकार जाण ||
सिंहावरी स्वर झाली | पदर खोविला ||१||
कालीरूप आईने | विष्णुरूप धरोनी ||
दोन्ही शिरे मांडीवरी | खड्गचक्र घेउनी ||
वधिले मधु कैटभ | दैत्याला ||२||
दशमुखी आईने वधिले | रक्तबीजाला ||
म्हैशासुर अद्यासूर | शुंभनीशुंभाला ||
मारिले चंडमुंड सर्व दैत्याला ||३||
भक्तांसाठी अंबाआली सोनई गावी ||
अरण्यात येउनी आई | विश्रांती घेई ||
लिंबलोण घेउनी हाती | रमा उभी सेवेला ||४||

नमन नमन विघ्नहरा | तुज ध्याता लंबोदरा |
गजवक्त्रा शांत सुंदरा | बुद्धी तूची बा ||१||
उठोनिया प्रातःकाळी | नयनी पाहू हिम नगबाळी |
शिवशक्ती चंद्रमौळी | नमन दोघांसी ||२||
दोघांचे एकची स्वरूप | प्रकृती पुरुष देख |
ऐक्य भाव निरंजन सुरेख | त्यांसी शरण जाऊ आता ||३||
सद्गुरूंचे करूंनी ध्यान | त्यांना असे आमुचे नमन |
मार्ग दाखविणारा तेचि जाण | संसार सागरा ते तारू ||४||
हस्तकमळांचे घेऊन दर्शन | भूमीसी करू वंदन |
सप्तसागर पर्वत नद्यांसी जाण | सकल जगा नमन माझे ||५||
ब्रम्हा विष्णू महेशास | गणपती सूर्य देवी शक्तीस |
आराधनपीठ यंत्रास | नमन माझे प्रातःकाळी ||६||
ऐसे नमन करुनी सकलांस | नाथ परंपरा सिद्धांस |
परांबिका आत्मस्वरूपास | नमन माझे सर्वकाळ ||७||
सूर्योदयापासून अस्तमानापर्यंत | जे जे कार्य करील देख |
ते ते सर्व तुमचे , आज्ञेने करील सुरेख | तुमचे चरणी अर्पीन बा ||८||
अस्तमान सूर्योदय पर्यंत | आपुलीच आज्ञा देख |
मज पामरा नाही ज्ञान संमत | अडाणी अज्ञान बाळ हा ||९||
तुम्हीच द्यावे मज ज्ञान | करावे माझे समाधान |
प्रातःकाली आलो शरण | रेणुकाई तुम्हा आता ||१०||
रेणुकाईसी साष्टांग दंडवत | प्रातःकाळ समयास |
तारील तारील आई देख | कुलस्वामिनी जगन्माता ||११||
||इति प्रातःस्मरण -काकडा ओव्या समाप्त ||

पद
नमन नमन जगदंब आई | चरणावरी ठेवितो डोई ||धृ ||
दुर्लभ हाची मनुष्य हा देह | तुझ्या कृपेने लाभला सर्व |
कर्तव्याची जाणीव देई | नमन नमन जगदंब आई ||१||
कर्तव्यासी भुलूनी जाता | पुनरपि जन्म असे मागुता ||
हरी ठेवी चरणी डोई | नमन नमन जगदंब आई ||२||

गुरु माझा प्राण विसावा | ह्यानेच तारिले जीवा ||धृ ||
ओळख सर्व करुनी दिधली | माया आवरुनी घेतली |
कर्तव्य दंड हाची दिधला | शुध्द चित्त केले जीवा ||१||
त्याग चिन्ह हे दंड असोनी | कर्तव्याचे ज्ञान देऊनी |
प्रपंच हाची उभा केला | वळण लाविले आत्मजीवा ||२||
परब्रम्ह निष्काम ठेवा | ओळख दिधली जीवाला ||
शरण शरण हरी शंभू शिवा | कृतकृतार्थ झाले जीवा ||३||

उठा उठा जागे व्हा रे | नाम तुम्ही घ्या रे ||
जगदंब ऐसे म्हणोनी | आईचे ध्यान धरा रे ||धृ ||
जड देह उभा ठेला | पंचतत्वी बनला रे |
वात कफ पित्त | त्रिदोषी भरला रे ||१||
रक्त मज्जा मांस हड्डी | सप्तधातू असती रे |
प्राण अपान व्यान उदान | चोवीस तत्वे शोधा रे ||२||
नश्वर असला नरदेह | मातीमध्ये मिळणार रे |
त्याच्यावरची प्रीती सोडूनी | गुरूला शरण जा रे |३||
सद्गुरु आपणा तोचि तारील | आत्मपदी बसाल रे |
कृष्णतनय म्हणे हरी | शरण शरण आईला रे ||४||

error: Content is protected !!